300 हून अधिक भारतीय प्रवासी 16 तास अडकले
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
लंडनहून मुंबईला येणाऱ्या व्हर्जिन अटलांटिक फ्लाइट व्हीएस358 ला ऑपरेशनल कारणांमुळे गुरुवारी तुर्कीमध्ये इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. या आपत्कालीन लँडिगमुळे 300 हून अधिक प्रवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला. या विमानातून प्रवास करणारे बहुतेक प्रवासी भारतीय होते. तुर्कीच्या दुर्गम दियारबाकिर विमानतळावर जवळपास 16 तास हे प्रवासी अडकून पडले होते. 2 एप्रिल रोजी लंडन हीथ्रोहून मुंबईला निघालेले उ•ाण व्हीएस358 तुर्कीच्या दियारबाकीर विमानतळावर तातडीने वैद्यकीय वळवण्याच्या कारणामुळे रद्द करण्यात आले. त्यानंतर तांत्रिक तपासणी आवश्यक ठरली, असे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले. प्रवाशांच्या झालेल्या गैरसोयीबद्दल कंपनीने खेद व्यक्त केला आहे. तसेच पुढील प्रवासाची सुविधा लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यासाठी कंपनीकडून नियोजन केले जात होते.









