रेल्वेमार्गाची दुरुस्ती पूर्ण : कोसळलेली दरड हटविली
बेळगाव : कॅसलरॉक ते करंझोळदरम्यान दरड कोसळल्याची घटना मंगळवार दि. 25 रोजी घडली होती. तेव्हापासून कोसळलेली माती रेल्वेमार्गावरून बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. रविवारी माती काढून ट्रॅक पुन्हा बसविण्याचे काम पूर्ण झाले असून यावरून रेल्वेची चाचणी यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली. दरड कोसळल्यापासून रेल्वेचे इंजिनियर व कर्मचारी करंझोळजवळ रात्रंदिवस काम करत होते. कोसळलेली दरड हटविण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर रेल्वेमार्ग नव्याने घालण्यात आला. बोगद्यापर्यंत रेल्वेमार्ग करण्याचे काम रविवारी पूर्ण झाले. रविवारी दुपारी 3.30 वाजता या मार्गावरून एक मालवाहू रेल्वे धावली. खबरदारीचा उपाय म्हणून ताशी 10 कि. मी. वेगाने ही रेल्वे धावत होती.