प्रत्येक गावात कोपरा सभा : विठ्ठल हलगेकर यांनी मतदारांच्या घेतल्या गाठीभेटी
खानापूर : लोंढा जिल्हा पंचायत क्षेत्रातील गावांतून भाजपचे उमेदवार विठ्ठल हलगेकर यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. लोंढा, राजवाळ, अस्तोली, आक्राळी या गावात भाजपने आपल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह पदयात्रा काढून मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. तसेच मतदारांना भाजपला मतदान करण्याचे आवाहन केले. यावेळी प्रत्येक गावात कोपरा सभा घेण्यात आली. याप्रसंगी तालुका अध्यक्ष संजय कुबल बोलताना म्हणाले, तालुक्याचा विकास खुंटला आहे. रस्ते, पाणी, आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडलेली आहे. रस्त्यांची दुरवस्था सर्वांसमोर आहे. तालुक्याची दुर्दैवी अवस्था ही सध्याच्या नेतृत्वामुळे झालेली आहे. यासाठी तालुक्यातील जनतेने तालुक्याच्या भविष्याचा विचार करून भाजपला मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले. य् ाावेळी बाबुराव देसाई म्हणाले, विठ्ठल हलगेकर हा सर्वसामान्य जनतेचा नेता आहे. तालुक्यातील सर्व परिस्थितीची माहिती असलेला सर्वसामान्य कुटुंबातील माणूस आहे. सहकाराच्या माध्यमातून सामान्य जनतेला तसेच शेतकरीवर्गाच्या हितासाठी अनेक उपक्रम राबविले आहेत. भाजपचे उमेदवार विठ्ठल हलगेकर यांना भरघोस मतांनी विजयी करावे, असे ते म्हणाले. प्रमोद कोचेरी म्हणाले, मोदींच्या नेतृत्वाखाली देशाने विकासात वेगळी झेप घेतली आहे. मात्र तालुक्याचे नेतृत्व दुसऱ्या पक्षाकडे असल्याने तालुक्याचा विकास गेल्या पाच वर्षांपासून थांबला आहे. तालुक्याच्या विकासासाठी भाजपला मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. जिल्हा पंचायतचे माजी सदस्य बाबुराव देसाई यांच्या नेतृत्वाखाली प्रचारदौरा करण्यात आला. य् ाावेळी विठ्ठल हलगेकर, किरण येळ्ळूरकर, प्रमोद कोचेरी, संजय कुबल, सुरेश देसाई, धनश्री देसाई, पी. वाय. देसाई, रमेश पाटील, मारुती गावडे, विष्णू गावडे, सीताराम मिराशी, रामचंद्र गावडे, संतोष मिराशी, रामा मिराशी यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.









