ऑनलाईन टीम / तरुण भारत :
Loksabha-Rajyasabha adjournment indefinitely लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांचे कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आले आहे. लोकसभा आणि राज्यसभेच्या बिझनेस ऍडव्हाझरी काऊन्सिलच्या कामकाज सल्लागार परिषदेच्या बैठकीत अचानकपणे यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे.
संसदेचं हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबरपासून सुरू झालं आहे. 29 डिसेंबरपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. मात्र, संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आलं आहे. त्यामुळे नियोजित 17 दिवसांच्या कालावधीपेक्षा 6 दिवस आगोदरच हे अधिवेशन गुंडाळण्यात आल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगत आहे.
अधिक वाचा : पुणे विमानतळावर आजपासून थर्मल स्क्रिनिंग








