बेळगाव : शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींच्या अमूल्य योगदानाची दखल घेत लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीने एक विशेष ठेव योजना ‘लोकमान्य विद्या-धन योजना’ सुरू केली आहे. ही योजना खासकरून शाळा व महाविद्यालयांतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांसाठी तयार करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ सेवानिवृत्त आणि सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. या योजनेची सुरुवात 1 जून 2025 पासून असून शेवटची तारीख 31 जुलै 2025 आहे. मुदत ठेव कालावधी 18 महिन्यांचा असून या कालावधीसाठी वार्षिक 10.50 टक्के व्याजाने परतावा मिळणार आहे. किमान ठेव रक्कम रु. 10,000 असून ठेवीसाठी कोणतीही कमाल मर्यादा नाही.
विशेष बाब म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना अतिरिक्त 0.50 टक्के व्याजाचा लाभ मिळणार आहे. लोकमान्य विद्या-धन योजना ही शिक्षण क्षेत्रातील सेवकांसाठी एक सुरक्षित, लाभदायक आणि सन्मानकारक ठेव पर्याय असून या योजनेला शिक्षण क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड ही विश्वास व उत्कृष्टतेचा वारसा लाभलेली अग्रगण्य संस्था महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आणि दिल्ली या चार राज्यांमध्ये कार्यरत असून या संस्थेचे 213 शाखांचे विस्तृत जाळे ग्राहकांना विविध प्रकारच्या आर्थिक सेवा प्रदान करते. लोकमान्य सोसायटी फिक्स्ड डिपॉझिट्स, रिकरिंग डिपॉझिट्स, कर्जे, विमा, म्युच्युअल फंड यासारखी विशिष्ट सेवा देत आहे. आर्थिक समावेश आणि सुरक्षितता वाढविण्यासाठी लोकमान्य सोसायटी नेहमीच प्रयत्नशील आहे. या ठेव योजनेसंदर्भात अधिक माहितीसाठी नजीकच्या लोकमान्य शाखेला भेट द्या, किंवा 1800-212-4050 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.









