बेळगाव : आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी महिलांसाठी एक विशेष ठेव योजना सादर करत आहे. ‘लोकमान्य महिला उडान निवेश योजना’ या नव्या ठेव योजनेद्वारे महिलांना अधिक आकर्षक आणि सुरक्षित गुंतवणुकीची संधी मिळणार आहे. योजना 555 दिवसांच्या मुदतीसाठी असून महिलांना 10.25 टक्के आकर्षक व्याजदर देण्यात येणार आहे. तसेच महिला ज्येष्ठ नागरिकांसाठी अतिरिक्त 0.50 टक्के अधिक व्याज मिळणार आहे. त्यामुळे त्यांना एकूण 10.75 टक्के व्याजदराचा लाभ मिळेल. किमान ठेव रक्कम फक्त रु. 10,000 असल्याने सर्व महिला या योजनेचा सहज लाभ घेऊ शकतात.
महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी कटिबद्ध
लोकमान्य सोसायटी नेहमीच आर्थिक क्षेत्रात नाविन्यपूर्ण संकल्पना राबवत महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी कटिबद्ध राहिली आहे. या विशेष योजनेद्वारे महिलांना त्यांच्या भविष्याच्या सुरक्षिततेसाठी उत्तम गुंतवणुकीचा पर्याय मिळणार आहे. त्यामुळे महिलांनी आपल्या आर्थिक सशक्तीकरणासाठी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा आणि उज्ज्वल भविष्याच्या दिशेने पाऊल टाकावे.
विश्वास, उत्कृष्टतेचा वारसा लाभलेली अग्रगण्य संस्था
पुणे, महाराष्ट्र येथे मुख्यालय असलेली लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप.सोसायटी लिमिटेड ही विश्वास व उत्कृष्टतेचा वारसा लाभलेली अग्रगण्य संस्था आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आणि दिल्ली या चार राज्यांमध्ये कार्यरत असलेल्या या संस्थेचे 213 शाखांचे विस्तृत जाळे असून, ग्राहकांना विविध प्रकारच्या आर्थिक सेवा पुरवल्या जातात. लोकमान्य सोसायटी फिक्स्ड डिपॉझिट्स, रिकरिंग डिपॉझिट्स, पिग्मी डिपॉझिट्स, कर्जे, विमा आणि म्युच्युअल फंड यासारखी विशिष्ट सेवा देत आहे. आर्थिक समावेश आणि सुरक्षितता वाढवण्यासाठी लोकमान्य सोसायटी नेहमीच प्रयत्नशील आहे. अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या लोकमान्य शाखेला भेट द्या किंवा 1800-212-4050 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधा, असे आवाहन संस्थेतर्फे केले आहे.









