कोनवाळ गल्ली येथील लोकमान्य रंगमंदिरात कार्यक्रम
बेळगाव : लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटी लि. यांच्यावतीने कोनवाळ गल्ली येथील लोकमान्य रंगमंदिर येथे अयोध्येतील श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापनेच्या शुभमुहूर्तावर ‘गीतरामायण’चा कार्यक्रम दि. 24 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता होणार आहे. सांगली येथील ‘स्वरवैभव क्रिएशन’ हा गायनमंच कार्यक्रमाचे सादरीकरण करणार आहे. या निमित्ताने बेळगावकरांना पुन्हा एकदा आधुनिक वाल्मिकी ग. दि. माडगुळकर यांची जादुई लेखणी व बाबूजींच्या जादुई स्वरमयी मेजवानीचा आस्वाद घेता येणार आहे. सर्वांचे श्र्रद्धास्थान असणारे प्रभू श्रीराम यांच्या अयोध्येत श्रीरामाच्या जन्मस्थानी त्यांच्या मूर्तीची पुनर्स्थापना झाली आहे. हा आनंदी क्षण साजरा करण्यासाठी ‘गीतरामायण’ या सुंदर कलाकृतीचा आस्वाद भाविकांना मिळावा यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला आहे.
नेहमीच समाजहित जोपासणाऱ्या लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीच्या स्तुत्य व रसिकजनांच्या जिव्हाळ्याचा विषय असणाऱ्या प्रभू श्रीराम या विषयाला अनुसरून असणाऱ्या उपक्रमास रसिकजनांचा उदंड प्रतिसाद लाभून हा कार्यक्रम पार पाडावा. सदर कार्यक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या व्यावसायिक अथवा सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांना जाहिरात द्यायची असल्यास त्वरित नजीकच्या लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीच्या 9686880102 या नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीतर्फे करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असून या कार्यक्रमास हेमगिरी युनिफॉर्म, अभिजीत देसाई कन्स्ट्रक्शन, किरण एअरकोन व ‘तऊण भारत’ बेळगाव यांचे सहकार्य लाभले आहे.









