प्रतिनिधी/ बेळगाव
लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीने 15, 16 आणि 17 ऑक्टोबर रोजी एम. व्ही. हेरवाडकर इंग्रजी माध्यम शाळेत सायंकाळी 5 ते 7.30 या वेळेत आकाशकंदील प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. हेरवाडकर शाळा, साऊथ कोकण एज्युकेशन सोसायटीच्या शाळा, जे. एन. भंडारी फाईन आर्ट्स कॉलेज शिनोळी, आरपीडी महाविद्यालय आणि आजूबाजूच्या शाळांचे विद्यार्थी या प्रदर्शनात सहभागी होणार आहेत. लोकमान्य सोसायटीचे संचालक मंडळ, बेळगाव जिल्हा प्राथमिक शिक्षण समिती आणि एसकेई सोसायटीचे संचालक मंडळ प्रदर्शन उद्घाटन समारंभासाठी खास उपस्थित राहणार आहेत. प्रत्येक वर्षी या प्रदर्शनाला पालक आणि विद्यार्थ्यांकडून खूप चांगला पाठिंबा मिळतो. डॉ. किरण ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.









