बेळगाव :
स्व. बाबुराव ठाकुर यांच्या 125 व्या जयंतीचे औचित्य साधून लोकमान्य सोसायटीतर्फे त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले. या संस्मरणीय प्रसंगी लोकमान्य सोसायटीचे संचालक पंढरी परब, गजानन धामणेकर आणि डॉ. दामोदर वागळे यांनी स्व. बाबुराव ठाकुर यांच्या योगदानाच्या आठवणींना उजाळा दिला. ‘दै. तरुण भारत’ वृत्तपत्राचे संस्थापक-संपादक म्हणून त्यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून अन्यायाविरुद्ध लढा दिला आणि समाजाला सक्षम केले, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. यावेळी सीईओ अभिजित दीक्षित, सीएफओ सीए वीरसिंग भोसले, जनसंपर्क अधिकारी सत्यव्रत नाईक व लोकमान्य सोसायटीचे अधिकारीवर्ग आणि कर्मचारी उपस्थित होते.









