किरण ठाकुर यांचे प्रतिपादन : लोकमान्य टिळक पुण्यतिथी गांभीर्याने
प्रतिनिधी /बेळगाव
लोकमान्य टिळक यांच्या आदर्शवत तत्त्वांनुसार आपली लोकमान्य को-ऑप. सोसायटी कार्यरत आहे. लोकमान्य टिळक जेव्हा बेळगावमध्ये आले होते, तेव्हा त्यांनी ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच’ अशी सिंहगर्जना ब्रिटिशांविरुद्ध केली होती. ब्रिटिशांविरुद्ध लढा उभारण्यात पंजाब येथील लाला लजपतराय, बंगाल येथील बिपीनचंद्र चॅटर्जी यांनी त्यांना सहकार्य केले, असे विचार लोकमान्य सोसायटीचे चेअरमन किरण ठाकुर यांनी मांडले.
सोमवारी गुरुवारपेठ, टिळकवाडी येथील लोकमान्य सोसायटीच्या कॉर्पोरेट कार्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सोसायटीचे उपाध्यक्ष अजित गरगट्टी, संचालक गजानन धामणेकर, सुबोध गावडे, प्रभाकर पाटकर, सीईओ अभिजित दीक्षित, सीएफओ वीरसिंग भोसले, समन्वयक विनायक जाधव यासह लोकमान्य परिवारातील सदस्य उपस्थित होते.









