वेंगुर्ले (वार्ताहर)-
वेंगुर्ल्यातील अरबी समुद्रामध्ये बॅक किक स्विमिंग करत 20 मिनिटांमध्ये 12 रुबिक क्युब अंतर सहजपणे पार करून भारत देशातून 14 वर्षाखालील वयोगटामध्ये विश्वविक्रमाची नोंद सिंधुदुर्ग जिल्हयामध्ये वेंगुर्ले या शहरातील स्नेहा रंजन नार्वेकर हिने केली आहे. असा विश्वविक्रम करणारी हि भारतातील पहिली मुलगी असल्याने लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटीव्ह सोसायटी शाखा वेंगुर्लेतर्फे तिचा शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ व भेटवस्तु देऊन शाखाधिकारी पुरूषोत्तम राऊळ यांनी सत्कार केला.सिंधुदुर्ग जिल्हयामध्ये वेंगुर्ले या शहरात रहाणारी, मदर तेरेसा स्कूल, वेंगुर्लेमध्ये इयत्ता आठवी मध्ये शिकणारी स्नेहा रंजन नार्वेकर हि एका शेतकऱ्याची मुलगी आहे. तिला लहानपणांपासून असलेली स्विमींग आवड लक्षात घेत तिच्या आई वडीलांनी प्रोत्साहन दिले.
आपल्या कुटुंबातील मुलगीप्रमाणे स्विमिंगचे तज्ञ प्रशिक्षक दिपक सावंत यांनी तिला प्रशिक्षण देत 14 वर्षाखालील मुली वयोगटामध्ये विश्वविक्रम करणारी हि भारतातील पहिली मुलगी घडविली आहे. तिच्या या रेकॉर्डची दखल, वर्ल्ड रेकॉर्ड्स इंडियाचे महाराष्ट्र-गोवा राज्यासाठी नियुक्त केलेले विशेष प्रतिनिधी सुषमा नार्वेकर व संजय नार्वेकर यांनी घेतली आहे. असून अलिकडेच स्नेहा रंजन नार्वेकर हिला या विक्रमाचे सर्टिफिकेट व मेडल देऊन तिला गौरविण्यात आले होते.
या देशातील विश्वविक्रमाची नोंद घेत लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटीव्ह सोसायटी शाखा वेंगुर्लेने सर्वप्रथम दाखल घेत स्नेहा नार्वेकर व तिचे गुरू जलतरण प्रशिक्षक दिपक सावंत यांचा खास सत्कार केला. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांत लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटीव्ह सोसायटीचे वेंगुर्ले शाखाधिकारी पुरूषोत्तम राऊळ, आरोग्य फार्मा शॉपीचे संचालक संजय पुनाळेकर, वेंगुर्ले तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रदीप सावंत, जिल्हा पत्रकार संघाचे सदस्य भरत सातोस्कर, लोकमान्य सोसायटीचे कर्मचारी चक्रपाणी गवंडी, सौ. प्रिया करंगुटकर, स्नेहल गांवकर, प्रकाश मालवणकर, सत्कार मुर्ती स्नेहा नार्वेकरचे, जलतरण प्रशिक्षक दिपक सावंत, रंजन नार्वेकर, व सौ. मानसी नार्वेकर यांचा समावेश होता.