प्रतिनिधी / बेळगाव
आजादी का अमृतमहोत्सवनिमित्त लोकमान्य राष्ट्रोत्सव ठेव योजना 1 ऑगस्ट पासून सुरू झाली असून योजनेचा शेवटचा दिवस 31 ऑगस्ट 2022 आहे. भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे झाल्यानिमित्त ही योजना सुरू केली आहे. ठेवीची किमान रक्कम रु. 75000 आणि त्यानंतर रु. 75000 च्या पटीत आहे. ठेवीची मुदत 750 दिवस (2 वर्षे आणि 20 दिवस) इतकी आहे. व्याजदर 9.75 इतका असून दर तिमाहीत व्याज दिले जाईल.
योजनेच्या इतर अटी व शर्ती पुढीलप्रमाणे आहेत- ही ठेव योजना केवळ सदस्यांसाठीच उपलब्ध आहे. पाल्यांच्या नावेसुद्धा या योजनेत भाग घेण्याची सोय आहे. पण पालकांनी संस्थेचे सभासद असणे गरजेचे आहे. ठेव रकमेच्या 90 टक्केपर्यंत कर्ज सोय उपलब्ध आहे. मुदतपूर्व ठेव काढायचीही मुभा आहे. अधिक माहितीसाठी लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीच्या नजीकच्या शाखेत संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.









