विभागातील 12 संघांचा सहभाग, 25 ते 28 दरम्यान स्पर्धा
बेळगाव : लोकमान्य को-ऑप. सोसायटी आयोजित लोकमान्य प्रिमीयर लीग आंतर विभागीय क्रिकेट स्पर्धा बुधवार दि. 25 डिसेंबर ते 28 डिसेंबर दरम्यान एसकेई प्लॅटिनम ज्युबिली मैदानावर आयोजित करण्यात आली आहे. सदर स्पर्धेत 12 संघांचा सहभाग असून अ गटात पुणे, मडगाव, तरुण भारत गोवा, ब गटात मुंबई, कोल्हापूर व मॅनेजमेंट, सी गटात रत्नागिरी-सांगली, तरुण भारत बेळगाव, सावंतवाडी, डी गटात बेळगाव, कार्पोरेट व म्हापसा आदी संघांना विभागण्यात आले आहे. बुधवार दि. 25 रोजी उद्घाटनाचा सामना सावंतवाडी व तरुण भारत, बेळगाव यांच्यात सकाळी खेळविण्यात येणार आहे.
दुसरा सामना मडगाव वि. तरुण भारत, गोवा, तिसरा सामना कोल्हापूर वि. मॅनेंजमेंट, चौथा सामना कार्पोरेट वि. म्हापसा, पाचवा सामना पुणे वि. मडगाव सहावा सामना मुंबई वि. मॅनेजमेंट यांच्यात खेळविला जाणार आहे. या साखळी सामन्यानंतर उपांत्यपूर्व, उपांत्य व अंतिम सामना खेळविला जाणार आहे. 10 षटकांचे सामने टेनिस बॉलने खेळविले जाणार आहेत. प्रत्येक गटातील दोन संघ बाद फेरीसाठी पात्र ठरणार आहेत. विजेत्या व उपविजेत्या संघांना रोख रक्कम व आर्षक चषक देण्यात येणार आहे. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, उगवता खेळाडू, मालिकावीर अशी वैयक्तिक बक्षिसे देण्यात येणार आहेत.









