बेळगाव : कर्नाटक राज्य फुटबॉल संघटना मान्यता प्राप्त, बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटना आयोजित लोकमान्य को-ऑप. सोसायटी पुरस्कृत वरिष्ठ साखळी फुटबॉल स्पर्धेच्या चषकाचे अनावरण मोठ्या उत्साहात पार पडल्या. गणाधीश लॉनवर फुटबॉल चषकाच्या अनावरण प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बेळगाव पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग, लोकमान्य सोसायटीचे संचालक गजानन धामणेकर, अजित गरगट्टी, विठ्ठल प्रभू, सुबोध गावडे, पंढरी परब, लेस्टर डिसोजा, गोपाळ खांडे, सचिव अमित पाटीलसह मान्यवर उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते चषकाचे अनावरण करण्यात आले.
यावेळी आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग म्हणाले, गेली 16 वर्षे लोकमान्य सोसायटीने बेळगावच्या होतकरु फुटबॉलपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी स्पर्धा पुरस्कृत करत आहे. बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेने ही स्पर्धा सतत चालु ठेवत होतकरु फुटबॉलपटूंना प्रोत्साहन दिले आहे. संघटनेने जास्तीतजास्त स्पर्धा भरवून खेळाडूंना वाव द्यावा, असे त्यांनी सांगितले. या स्पर्धेतील विजेत्या संघाला 55 हजार रुपये रोख, आकर्षक चषक, उपविजेत्या संघाला 35 हजार रुपये रोख व चषक, तिसऱ्या क्रमांका पटकविणाऱ्या संघाला 25 हजार रुपये, चषक तर चौथ्या क्रमांक पटकाविणाऱ्या संघाला 15 हजार रुपये रोख व चषक देवून गौरविण्यात येणार आहे. त्याच प्रमाणे स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू, उगवता खेळाडू, उकृष्ट गोलक्षक, उत्कृष्ट शिस्तबद्ध संघ अशी वैयक्तिक बक्षीसेही देण्यात येणार आहेत.
या स्पर्धेत ब्रदर्स फुटबॉल क्लब, कॉसमॅक्स फुटबॉल संघ, दर्शन युनायटेड क्लब, इलेव्हन स्टार फुटबॉल क्लब, फास्ट फार्वर्ड फुटबॉल क्लब, फँको फुटबॉल क्लब, गोवन्स, मोहब्ल्यु स्पोर्ट्स क्लब, निपाणी फुटबॉल अकादमी, शिवाजी कॉलनी फुटबॉल क्लब, स्वस्तीक फुटबॉल क्लब, साईराज फुटबॉल क्लब, टिळकवाडी फुटबॉल असॉल्ट, टिळकवाडी फुटबॉल क्लब, युनायटेड गोवन्स रिक्रेशन क्लब, यंग मॅन ख्रिश्चन असोसिएशन, युनायटेड युथ क्लब व झिकझॅक क्लब अशा 18 संघांनी या साखळी स्पर्धेत भाग घेतला आहे. स्पर्धा लगेच सुरु होणार असून ठिकाण आणि वेळ लवकरच घोषित करण्यात येणार आहे. या चषकाच्या अनावरण प्रसंगी संघटनेचे पदाधिकारी प्रशांत देवदानम, अल्लाबक्ष बेपारी, एस. एस. नरगोडी, उमेश मजुकर, जॉर्ज रॉड्रीग्ज, अरिहंत बल्लाळ, मयुर कदम, दिनेश पत्की आदी उपस्थित होते.









