बेळगाव : लोकमान्य मल्टिपर्पज को ऑपरेटिव्ह को सोसायटीच्यावतीने ‘लोकमान्य दिवाळी किल्ला स्पर्धा 2023’ चे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धा बेळगाव महानगरपालिका हद्द मर्यादित आहेत. संस्थेच्या स्थापनेपासून श्री. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास व गड किल्यांची माहिती व्हावी या उद्देशाने सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. या स्पर्धेस बेळगाव शहरातील तऊणांचा व बालचमूंचा भरभरून प्रतिसाद मिळतो व शिवमय वातावरण बेळगाव शहरात निर्माण होते. स्पर्धा सहा विभागात घेण्यात येणार आहेत. बेळगावा1, बेळगाव-2, शहापूर, वडगाव, अनगोळ, टिळकवाडी विभागात घेण्यात येणार आहेत. किल्ला स्पर्धा भरविण्याकरिता संस्थेचे अध्यक्ष किरण ठाकुर, उपाध्यक्ष अजित गरगट्टी, संचालक मंडळ गजानन धामणेकर, पंढरी परब, संचालक सुबोध गावडे यांचे मार्गदर्शन लाभत आहे. प्रत्येक विभागातील विजेत्यांना रोख बक्षिसे दिले जातील व स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट किल्ल्यास गडांचा राजा हा किताब दिला जाईल.
नावनोंदणी 17 पर्यंत करण्याचे आवाहन
स्पर्धेत भाग घेणाऱ्यांनी आपल्या प्रवेशिक खालील ठिकाणी लोकमान्य मल्टिपर्पज को ऑपरेटिव्ह को सोसायटीच्या शाखांमध्ये द्याव्यात. कोनवाळ गल्ली शाखा (रोहन मेहंदळे), शहापूर शाखा (बसवराज बिरादर), वडगाव शाखा (रेवती जोशी), अनगोळ शाखा (प्रसाद नाडगौडा), टिळकवाडी शाखा (ज्योती रेगे), क्लब रोड शाखा (ज्योती गंभीर). नांवे नोंदविण्याची शेवटची तारीख 17 नोव्हेंबर 2023 पर्यंत आहे. बेळगाव महानगरपालिका हद्दीतील किल्ला प्रेमींनी त्वरित संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.









