बेळगाव : लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीतर्फे नवीन ठेव योजना ‘लोकमान्य चाईल्ड इन्व्हेस्टमेंट स्कीम’ 14 नोव्हेंबरपासून सुरू झाली आहे. बालदिनाचे औचित्य साधून ही योजना सुरू करण्यात आली आहे. संस्थेचे अध्यक्ष किरण ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना खास लहान मुला-मुलींसाठी चालू करण्यात आली आहे. या योजनेची खास वैशिष्ट्यो म्हणजे ही योजना दीर्घकालीन बचत योजना असून पालकांना त्यांच्या मुलांच्या भविष्यातील शिक्षणासाठी किंवा इतर महत्त्वपूर्ण खर्चासाठी बचत करण्यास प्रोत्साहित करेल. मुलांच्या भविष्यासाठी एक सुरक्षित आर्थिक आधार प्रदान करण्याचे महत्त्वपूर्ण काम करेल. तसेच त्यांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण टप्प्यांमध्ये आर्थिक स्थिरता आणि सुरक्षितता सुनिश्चित करेल. ‘लोकमान्य चाईल्ड इन्व्हेस्टमेंट स्कीम’ या ठेवीची मुदत 120 महिने (10 वर्षे) आहे. ठेवीची किमान रक्कम रु. 10,000 असून एका खात्यात जास्तीत जास्त रक्कम जमा करण्याची मर्यादा फक्त रु. 2 लाख इतकी आहे.
रु. 10,000 गुंतवणुकीवर 10 वर्षे मुदत ठेवीवर रु. 15,000 चा परतावा मिळेल. ही ठेव योजना अल्पवयीन मुलांसाठी आहे; त्यामुळे जन्म प्रमाणपत्राच्या आधारावर अल्पवयीन व्यक्तीच्या नावावर ठेव खाते उघडले जाईल आणि खातेदार मुलांची सर्व कागदपत्रे व दस्तऐवज सादर करणे अनिवार्य आहे. या योजनेत केवळ अल्पवयीन व्यक्तीच्या नैसर्गिक पालकाला (आई/वडील) खाते उघडण्याची परवानगी आहे. तसेच नैसर्गिक पालक लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीचे ग्राहक सभासद असणे आवश्यक आहे. खाते उघडताना पालकांचे व पाल्यांचे 3 फोटो व आवश्यक कागदपत्रे सादर करणे अनिवार्य आहे. नियम व अटींवर खातेदारास मुदतपूर्व खाते बंद करण्याची मुभा असून मुदत ठेवीवर 90 टक्केपर्यंत कर्ज मिळण्याची तरतूद या योजनेत केली आहे. योजनेसंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीच्या नजीकच्या शाखेशी किंवा टोल फ्री क्र. 18002124050 वर संपर्क साधावा.









