पुणे येथील विभागीय कार्यालयास विविध क्षेत्रातील मान्यवरांची भेट : शुभेच्छांचा वर्षाव
पुणे : ‘लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लि.’चा 30 वा वर्धापनदिन रविवारी उत्साहात साजरा करण्यात आला. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पुणे येथील विभागीय कार्यालयास भेट देऊन शुभेच्छा दिल्या. ‘लोकमान्य सोसायटी’ने 31 ऑगस्ट रोजी स्थापनेची 30 वर्षे पूर्ण केली. या निमित्ताने पुण्यातील सेनापती बापट रोडवरील विभागीय कार्यालय, पुणे परिसरातील तसेच सातारा, वाई, कराड, उंब्रज, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर येथील शाखांमध्ये स्थापनादिन उत्साहात साजरा करण्यात आला.
रविवार असूनदेखील सभासद-ग्राहक, हितचिंतक व मान्यवर पुणेकरांनी प्रत्यक्ष कार्यालयास भेट देऊ शुभेच्छा दिल्या. यावेळी ‘लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लि.’चे संस्थापक-अध्यक्ष डॉ. किरण ठाकुर यांनी सर्वांना धन्यवाद देत शुभेच्छांचा स्वीकार केला. यावेळी ‘लोकमान्य सोसायटी’च्या पुणे विभागाचे प्रमुख सुशील जाधव व पदाधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्या नागरिकांमध्ये आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, प्रसारमाध्यम, वैद्यकीय, उद्योग आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश होता. वित्तीय क्षेत्रात पारदर्शक व्यवहाराच्या बळावर नागरिकांच्या पसंतीला उतरलेल्या ‘लोकमान्य सोसायटी‘ने सहकारातून समृद्धीकडे हा मंत्र कायम जपला आणि जोपासला. त्याचाच एक परिपाक म्हणून स्थापनदिनी शुभेच्छांचा ओघ वाढत आहे, असे मनोगत ‘लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लि.’चे संस्थापक-अध्यक्ष डॉ. किरण ठाकुर यांनी व्यक्त केले.
स्थापनादिनानिमित्त ‘लोकमान्य’तर्फे ‘आनंदोत्सव निवेश-2025’ योजना
स्थापनदिनानिमित्ताने ‘लोकमान्य’तर्फे ‘आनंदोत्सव निवेश-2025’ ही मुदत ठेव योजना सादर करण्यात आली आहे. तीस महिन्यांच्या कालावधीसाठी असलेल्या या गुंतवणूक योजनेसाठी 10.50 टक्के इतका आकर्षक व्याजदर असणार आहे. सभासद-ग्राहक या योजनेत दहा हजार ऊपयांपासून किमान गुंतवणूक करू शकतात. स्थापनदिनी या विशेष गुंतवणूक संधीचा लाभ घेण्याचे आवाहन ‘लोकमान्य सोसायटी’तर्फे केले आहे.









