बेळगाव : लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीने आपल्या ठेवीदारांसाठी एक नवी ठेव योजना ‘लोकमान्य अक्षय योजना’ सादर केली असून, अल्पकालीन आणि सुरक्षित गुंतवणुकीचा शोध घेत असलेल्या गुंतवणूकदारांसाठी ही योजना अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. ही ठेव योजना 13 महिन्यांच्या मुदतीसाठी असून, ठेवीदारांना 10% आकर्षक व्याजदर दिला जाणार आहे. विशेष म्हणजे, ज्येष्ठ नागरिकांसाठी अतिरिक्त 0.50% व्याज देण्यात येणार आहे. त्यामुळे ज्येष्ठ ठेवीदारांना एकूण 10.50% पर्यंत व्याजदराचा लाभ घेता येणार आहे.
योजना सर्वसामान्यांसाठी सहज उपलब्ध
किमान ठेव रक्कम फक्त रु. 10,000 असून ही योजना सर्वसामान्यांसाठी सहज उपलब्ध आहे. अल्पकालीन गुंतवणुकीच्या माध्यमातून निश्चित परतावा मिळवू इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी ही योजना अत्यंत उपयुक्त आहे. लोकमान्य सोसायटीने सदैव आपल्या ठेवीदारांच्या हिताला प्राधान्य देत नाविन्यपूर्ण आणि विश्वासार्ह आर्थिक सेवा पुरविल्या आहेत. ‘लोकमान्य अक्षय योजना’ या नव्या योजनेतूनही सोसायटीने आपल्या सदस्यांना आर्थिक स्थैर्य आणि सुरक्षिततेचा मजबूत पर्याय उपलब्ध करून दिला आहे.
विश्वास-उत्कृष्टतेचा वारसा लाभलेली अग्रगण्य संस्था
लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लिमिटेड ही विश्वास व उत्कृष्टतेचा वारसा लाभलेली अग्रगण्य संस्था महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आणि दिल्ली या चार राज्यांमध्ये कार्यरत असून या संस्थेच्या 213 शाखांचे विस्तृत जाळे ग्राहकांना विविध प्रकारच्या आर्थिक सेवा प्रदान करते. लोकमान्य सोसायटी फिक्स्ड डिपॉझिट्स, रिकरिंग डिपॉझिट्स, कर्जे, विमा आणि म्युच्युअल फंड यासारखी अशी विशिष्ट सेवा देत आहे. आर्थिक समावेश आणि सुरक्षितता वाढवण्यासाठी लोकमान्य सोसायटी नेहमीच प्रयत्नशील आहे. या ठेव योजनेसंदर्भात अधिक माहितीसाठी नजीकच्या लोकमान्य शाखेला भेट द्या किंवा 1800-212-4050 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेतर्फे केले आहे.









