क्रिकेट सेट, लगोरी तसेच 34 लिटरचा स्टील वॉटर फिल्टरही
बेळगाव : लोककल्प फाऊंडेशनच्या सहकार्याने कापोली येथील सरकारी शाळेला क्रिकेट सेट, लगोरी तसेच 34 लिटरचा स्टील वॉटर फिल्टर देण्यात आला. शालेय विद्यार्थ्यांना मनसोक्त खेळता यावे, तसेच त्यांना शुद्ध पाणी मिळावे, या हेतूने हे साहित्य देण्यात आले. लोककल्पने दत्तक घेतलेल्या 32 गावांमध्ये कापोली गावचा समावेश आहे. या मदतीबद्दल शिक्षक, विद्यार्थी व गावकऱ्यांनी लोककल्पला धन्यवाद दिले.









