ओटवणे | प्रतिनिधी
बांदा पोलिस ठाण्याच्यावतीने सरमळे गावात आयोजित करण्यात आलेल्या लोकसंवाद कार्यक्रमाला विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सरमळे ग्रामपंचायत येथे घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात सायबर गुन्हे, नशा मुक्ती, महिला व मुलांविषयीचे गुन्हे, अंमली पदार्थ, आर्थिक गुन्हे, जातीय व सामाजिक तंटे, देवस्थान वाद, अवैद्य धंदे, ज्येष्ठ नागरिक समस्या, ड्रग याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी व्यासपीठावर बांदा पोलीस ठाण्याचे सरमळे बीट अंमलदार श्री. तेली, सरमळे सरपंच विजय गावडे,पोलिस पाटील दीपक नाईक, ज्येष्ठ नागrक नाना गावडे, माजी सरपंच रुचिता सावंत, माजी उपसरपंच समीर माधव, ग्रामपंचायत सदस्य राजन कांबळे, रेवती सावंत, संजना सावंत, सुहासिनी सावंत, दिव्या गावडे, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सरस्वती गावडे, शिक्षिका दीपा गवस, आरोग्य सेविका आशा शितल सावंत उपस्थित होत्या. यावेळी बांदा ठाण्याचे सरमळे बीट अंमलदार श्री तेली यानी लोकांचे सहकार्य असेल तर गावातील गुन्हे, तंटे व इतर असामाजिक तत्त्वांचा त्वरीत बंदोबस्त करता येणे शक्य असल्याचे सांगून उपस्थित नागरिक व विद्यार्थ्यांशी संवाद साधत कायदेविषयक जनजागृती केली. या कार्यक्रमाला सरमळे गावातील शालेय विद्यार्थ्यांसह शिक्षक, ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभारप्रदर्शन शिक्षिका दीपा गवस यांनी केले.









