Satej Patil On Sanjay Mandlik : काँग्रेस पक्षाने 48 लोकसभा मतदार संघाचा आढावा घेतला आहे. कोल्हापूरमधील 2 पैकी 1 जागा लढवावी अशी भूमिका काँग्रेसने सुद्धा घेतलीय.चार राज्यातल्या विधानसभा सोबत लोकसभा घ्यायची का अशी चर्चा आहे अजून सुरु आहे. महिनाभरात चित्र स्पष्ट होईल त्यानंतर आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू अशी प्रतिक्रिया माजी गृहमंत्री सतेज पाटील यांनी दिली. प्रत्येक पक्षाला वाटते आम्हाला जागा मिळावी महाविकास आघाडी म्हणून आम्ही निवडणूक लढवणार ज्यांना जे वाटणीला येईल तसे पुढे निर्णय होतील, असेही ते म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, पक्ष म्हणून शिस्त असणे गरजेचे आहे. जाहीरपणे पक्षाची बदनामी पटणारी नव्हती. काँग्रेसचे मुख्यमंत्री ज्या ज्या राज्यात आहेत ते सर्वजण प्रत्येक राज्यात जाऊन त्यांची काम सांगत असतात. त्यांचा प्रभाव महाराष्ट्रातल्या राजकारणात होईल हा विश्वास आहे. राजू शेट्टी यांच्यासोबत अद्याप काही चर्चा नाही. एका कार्यक्रमात त्यांची माझी भेट झाली आहे पण निवडणुकीबाबत काहीही चर्चा झाली नसल्याचे ते म्हणाले.
हेही वाचा- कोल्हापुरात महाडिक गटाला धक्का, मुडशिंगीत सरपंचांसह कार्यकर्ते पाटील गटात
इतिहासाच्या पानात जाण्यात अर्थ नाही आता भविष्यात काय हे पाहायला पाहिजे.एक वर्षे निवडणुकीला राहिलेत आणि महाविकास आघाडी म्हणून आम्ही या निवडणुकीला सामोरे जाणार.संजय मंडलिक मला विविध कार्यक्रमांमध्ये भेटतात मात्र त्या ठिकाणी कुठलीही राजकीय चर्चा नाही अथवा निवडणुकी संदर्भात कुठलीही चर्चा झालेली नाही असेही ते म्हणाले.

यावेळी बोलताना आमदार ऋतुराज पाटील म्हणाले, गडमुडशिंगी मधील सरपंच आणि दोन सदस्यांनी आमच्या गटात प्रवेश केला आहे.गडमुडशिंगी गाव मोठं आहे त्यामुळे हे आमच्यासाठी महत्वाचे आहे.लोकांचा सातत्याने सतेज पाटील यांच्यावरचा विश्वास वाढत आहे. त्यामुळे त्यांच्यावरच्या विश्वासमुळेच आमच्या गटात हा प्रवेश झाला असल्याचे ते म्हणाले.
कोल्हापूर एअरपोर्टसंदर्भात बोलताना ते म्हणाले की, सप्टेंबरपर्यंत टर्मिनस बिल्डिंग पूर्ण होतील त्यापद्धतीने काम सुरू आहे.युद्धपातळीवर कामे सुरू आहेत.
त्यामुळे कोल्हापूर विमानतळ एक चांगल्या दर्जाचे विमानतळ असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.








