ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे. या जागेसाठी भाजप आणि मविआकडून उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. अशातच पुण्यात भावी खासदार म्हणून राष्ट्रवादीच्या नेत्याचे पोस्टर झळकत आहेत. हे पोस्टर्स अनेकांचे लक्ष्य वेधून घेत आहेत.
भाजप आणि मविआने या निवडणुकीसंदर्भात अद्याप कोणताही निर्णय घेतला नसल्याचे म्हटले आहे. मात्र, भाजपने या जागेसाठी गिरीश बापट यांची सून स्वरदा बापट, माजी महापौर मुरलीधर मोहळ आणि माजी खासदार संजय काकडे यांच्या नावाची चाचपणी सुरू केली आहे. यापैकी एकाला भाजप तिकीट देणार असल्याचे सांगण्यात येते.
तर मविआकडून काँग्रेसचे नवविर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर आणि मोहन जोशी यांच्या नावाची चर्चा आहे. असे असतानाच आज राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शहरात भावी खासदार म्हणून माजी महापौर प्रशांत जगताप यांचे पोस्टर लावले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीही या जागेसाठी इच्छूक असल्याचे दिसून येते.








