पतसंस्था कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेऱयांची नितांत गरज : पोलीस निरीक्षक सुरेश शिंगे यांचे संचालकांना आवाहन
वार्ताहर /खानापूर
शहर परिसरात वाढत्या चोऱया व सुरक्षितता या संदर्भात अनेक संस्थाचालक गाफील आहेत. प्रत्येक संस्थाचालकांनी आपापल्या प्रधान कार्यालय अथवा उपकार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरा बसवावा, पोलीस खातेही नियमितपणे आपली गस्त शहर परिसरात करत असते. कोरोनानंतरच्या काळात वाढलेल्या बेरोजगारीमुळे चोरीच्या प्रकारात मोठी वाढ झाली आहे. प्रत्येक संस्थाचालकांनी सुरक्षिततेचे नियम पाळावेत, असे मार्गदर्शन खानापूरचे पोलीस निरीक्षक सुरेश शिंगे यांनी बुधवारी तालुक्मयातील काही प्रमुख पतसंस्था संचालकांच्या बैठकीत सांगितले.
मुख्यतः तालुक्मयात अनेक पतसंस्थांच्या थकित कर्ज वसुलीसंदर्भात जेएमएफसी न्यायालयात दावे सुरू आहेत. या अंतर्गत येत्या 20 ते 25 जूनदरम्यान कर्ज वसुलीसंदर्भात लोकअदालतीचे आयोजन खानापूर न्यायालयाच्या न्यायाधीशांनी केले आहे. या लोकअदालतमध्ये 470 जणांना नोटिसा जारी करण्यात आल्या असून नोटीस जारी करण्यात आलेल्या थकित कर्जधारकांना न्यायालयात हजर करणे पोलीस प्रशासनाची जबाबदारी आहे. यासाठी संबंधित पतसंस्थांच्या संचालकांनी 20 ते 25 जूनदरम्यान उपस्थित राहून लोकअदालतीद्वारे आपल्या कर्जवसुलीचे धोरण निश्चित करावे, असे आवाहनही यावेळी त्यांनी केले.
ठेवीदार उंबऱयात तर कर्जदार घरात
गेल्या दोन वर्षात कर्जवसुली झाली नसल्याने अनेक पतसंस्थांची आर्थिक घडी विस्कटली आहे. कर्जदार कर्ज भरण्यास अपेक्षित सहकार्य करत नाहीत. त्यामुळे ठेवीदारांच्या ठेवी परत करण्यासाठी पतसंस्था चालकांना कसरत करावी लागत आहे. यासाठी पतसंस्था चालकांना कर्जवसुली करणे कठीण बनले आहे. या कर्जवसुलीसाठी पोलीस प्रशासनाने पतसंस्थांना सहकार्य करावे, अशी विनंती यावेळी उपस्थित संस्था संचालकांनी केली.
यावेळी पतसंस्थांच्या सुरक्षिततेसंदर्भात बोलताना पोलीस निरीक्षक शिंगे म्हणाले, ठेवीदारांची ठेव परत करण्यासाठी पतसंस्थांची वसुली अत्यंत गरजेची आहे. यासाठी पोलिसांचे सहकार्य राहील. त्याचप्रमाणे वाढत्या चोऱयांसंदर्भात सतर्कता म्हणून प्रत्येक पतसंस्थेमध्ये कॅमेरा बसविणे, सोसायटीत रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसारच शिलकी रक्कम ठेवावी. मुख्य शाखेच्या ठिकाणी सिक्मयुरिटी गार्डची नियुक्ती करावी, रात्री पोलिसांची गस्त असतेच, पण बीट पोलीस आवश्यक असल्यास पतसंस्था चालकांनी पोलिसांना तशी माहिती द्यावी, अशा अनेक सूचना यावेळी त्यांनी मांडल्या.
बैठकीला भाग्यलक्ष्मी पतसंस्थेचे सचिव व तालुका पतसंस्था संघटनेचे सेपेटरी भाऊसाहेब चव्हाण, समृद्धी पतसंस्थेचे संस्थापक संजय कुबल, पिराजी कुऱहाडे, ज्योतिर्लिंग पतसंस्थेच्या सचिव ज्योती मोरे, तोपिनकट्टी महालक्ष्मी पतसंस्थेचे अरुण काकतकर, सह्याद्री पतसंस्था, विठ्ठल रखुमाई पतसंस्था, लोकसेवा पतसंस्था, सातेरी माऊली पतसंस्था, क्रांतिसेना पतसंस्था, नवहिंद पतसंस्था, गजानन पतसंस्था आदी पतसंस्थांचे सचिव व संचालक उपस्थित होते.









