वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारताचे माजी उपपंतप्रधान आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे दिल्लीच्या अपोलो रुग्णालयात नेण्यात आले आहे. डॉक्टर्स त्यांच्या प्रकृतीकडे लक्ष देत असून ती स्थिर आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. जुलैच्या पहिल्या सप्ताहातही त्यांच्यावर याच रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. नंतर त्यांची प्रकृती सुधारल्यानंतर त्यांना घरी जाऊ देण्यात आले होते. अडवाणी सध्या 96 वर्षांचे असून वृद्धापकाळामुळे काहीवेळा त्यांच्या प्रकृतीच्या समस्या उद्भवत असतात. काही महिन्यांपूर्वी त्यांच्यावर एम्स रुग्णालयातही उपचार करण्यात आले होते. याहीवेळी त्यांना लवकरच घरी जाऊ देण्यात येईल, असे त्यांच्या कुटुंबीयांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.









