अध्ययनातून झाला खुलासा
आयुर्मान कसे वाढवावे यावर वैज्ञानिक सातत्याने संशोधन करत आहेत. अनेक तज्ञ आता अमरत्वाबद्दल देखील बोलू लागले आहेत. अमरत्वाचा फॉर्म्युला अद्याप मिळाला नसला तरीही दीर्घायुष्य मिळविण्याची एक सोपी अन् सुंदर पद्धत मिळाली आहे. अमेरिकेच्या नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीच्या नव्या संशोधनात वृक्षांच्या सान्निध्यात राहणाऱ्यांमध्ये अनेक जैविक आणि मॉलिक्यूलर बदल घडून येत असल्याचे म्हटले गेले आहे. या बदलांमुळे क्रोनोलॉजिकल म्हणजेच आयुष्य अधिक होते असेही नमूद करण्यात आले. हे संशोधन सायन्स अॅडव्हान्सेस नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे.
आपण कसे राहतो आणि आहार घेतो यावर एखाद्याचे जैविक वय निश्चित होते. याचनुसार हे कमी किंवा अधिक होऊ शकते. जर लोकांचे बायोलॉजिकल वय त्यांच्या क्रोनोलॉजिकल वयापेक्षा अधिक असेल तर ते लवकर वृद्ध होतील, वृद्धत्वात येणारे आजार त्यांनी पूर्वीच घेरतील आणि तसेच त्यांचा मृत्यू देखील लवकर होऊ शकतो. येथे क्रोनोलॉजिकल वयाचा अर्थ खऱ्याखुऱ्या वयाशी निगडित आहे.

बायोलॉजिकल वय जर खऱ्या वयापेक्षा कमी असल्यास असा व्यक्ती इतरांयच तुलनेत अधिक काळ तरुण दिसतो, पूर्वी हे वय कमी करण्यासाठी सकस आहार अन् व्यायाम करण्यास सांगितले होते, परंतु हिरव्या भाज्यांचे सेवन करणेच नव्हे तर हिरवाई असलेल्या ठिकाणी वास्तव्य केल्याने देखील आयुर्मान अधिक होत असल्याचे तज्ञांचे सांगणे आहे.
संशोधनासाठी अमेरिकेतील 4 शहरांची निवड करण्यात आली, ज्यात हिरवाई असलेल्या ठिकाणी राहणारे लोक आणि काँक्रीटच्या जंगलात राहणारे लोक असे दोन हिस्से होते. जवळपास 900 लोकांवर हे संशोधन सुमारे 2 दशकांपर्यंत चालले. हिरवाईच्या सान्निध्यात राहिल्याने आरोग्यावर कोणता प्रभाव पडतो हे जाणून घेण्याचा उद्देश या संशोधनामागे होता.

पथकाने या लोकांच्या डीएनएच्या तपासणीत एक केमिकल दिसून आला, ज्याला मिथाइलेशन म्हटले जाते. ही प्रक्रिया तशी डीएनएमध्ये होत राहते, परंतु वय वाढण्यासोबत यात बदल दिसू लागतो. याला एपिजेनेटिक क्लॉक म्हटले जाते. एपिजेनेटिक क्लॉक आपण तरुण किंवा वृद्ध असल्याचे दर्शवित असते. जे लोक हिरवाईच्या सान्निध्यात राहत होते, त्यांच्यात एपिजेनेटिक क्लॉक तितकेच मंदगतीने चालत होते असे संशोधनात दिसून आले आहे. ज्या लोकांच्या घरांच्या 5 किलोमीटरच्या कक्षेत 30 टक्क्यांपर्यंत हिरवाई होती, ते इतरांच्या तुलनेत अधिक युवा दिसून येत होते.









