वृत्तसंस्था / पाटणा
बिहार जीविका निधी पत सहकारी संघाच्या अंतर्गत बचत गटांशी संबंधित महिलांना परवडणाऱ्या व्याजदराने कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. या योजनेसाठी मंगळवारी पंतप्रधान मोदींनी संस्थेच्या बँक खात्यात 105 कोटी रुपयांची रक्कम हस्तांतरित करत योजनेचा शुभारंभ केला. यावेळी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी आणि विजय कुमार सिन्हा यांच्यासह अनेक वरिष्ठ राज्य सरकारी अधिकारी पटना येथून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जोडले गेले होते. ‘जीविका निधी’ ही नवीन सहकारी संस्था बिहारमधील बचत गटांशी संबंधित ग्रामीण महिलांच्या उद्योजकीय कौशल्यांना प्रोत्साहन देईल. ही सहकारी संस्था स्थापन करण्याचा उद्देश बचत गटांशी संबंधित महिलांना परवडणाऱ्या व्याजदरावर सुलभ कर्ज देणे हा आहे.









