मुख्य जिल्हासत्र न्यायालयाचे न्यायाधीश मुस्तफा हुसेन यांचे प्रतिपादन
बेळगाव : आपल्या लोकशाही देशामध्ये भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी काही तत्वे घालून दिली आहेत. त्या तत्वाशी, शिकवणीशी समरस होऊन प्रत्येकाने आपल्या जीवनात यशस्वी होणे ही काळाची गरज आहे. न्याय व्यवस्था ही त्यांनी दिलेल्या घटनेतील मार्गदर्शनानुसार यशस्वीरित्या चालत आहे, असे मुख्य जिल्हासत्र न्यायालयाचे न्यायाधीश मुस्तफा हुसेन यांनी सांगितले. बेळगाव बार असोसिएशनतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती न्यायालयामध्ये साजरी करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बार असोसिएशनचे उपाध्यक्ष अॅड. सुधीर चव्हाण होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन न्यायाधीश मुस्तफा हुसेन यांच्या हस्ते करण्यात आले. जनरल सेक्रेटरी अॅड. गिरीराज पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आले. यावेळी अॅड. डी. एम. पाटील, अॅड. संद्रीमनी यांनी विचार व्यक्त केले. कार्यक्रमाला जॉईंट सेक्रेटरी अॅड. बंटी कपाई, अॅड. पी. के. पवार, अॅड. उदोसी, अॅड. संतोष टी.के. यांच्यासह वकील उपस्थित होते.









