Literary wall made by children in Tondavali upper school
मराठी राज्य भाषा दिनी अनोख्या उपक्रमातून साहित्यिकांची ओळख
आपल्या मराठी भाषेला समृद्ध करण्यासाठी अनेक साहित्यिकांनी प्रयत्न केले. या साहित्यिकांच्या प्रयत्नांमुळेच आपली मराठी भाषा समृद्ध झाली आहे आपल्या संस्कृतीचा वारसा मराठी भाषेचा वसा जपावा साहित्यिकांची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी साहित्यिकांनी ज्या अनेक कलाकृती निर्माण केल्या त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचाव्या व मराठी भाषेचे संवर्धन व्हावे या हेतूने जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा तोंडवली वरची या शाळेत साहित्यिकांच्या कार्याचा परिचय देणारी 15 फूट लांबीची साहित्यिक भिंत तयार करण्यात आली.ज्या भिंतीवरती विद्यार्थ्यांनी विविध साहित्यिकांची पुस्तके विविध साहित्यिकांचा जीवनपट तसेच त्यांनी लिहिलेल्या कथा कविता यांची कलात्मकतेने मांडणी केली व त्या सर्व साहित्यिकांची माहिती अवगत करून घेतली ही सुंदर अशी भिंत तयार करण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. शितल माडये पदवीधर शिक्षक श्री. राजेश भिरवंडेकर व श्री. परशुराम गुरव तसेच श्री. रुपेश दुधे व श्री. अशोक डोंगळेसर यांनी परिश्रम घेतले शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. महेश चव्हाण यांनी या उपक्रमाबद्दल शाळेचे कौतुक केले आहे.
आचरा प्रतिनिधी









