ग्रा. पं.ने तातडीने रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी
उचगाव : उचगावमधील नागेशनगर भागामध्ये अनगोळ गल्लीमार्गे ये-जा करणाऱ्या रस्त्याची अक्षरश: दुर्दशा झाल्याने या रस्त्यावरून सध्या चालणेही मुश्किल झाले आहे. तरी तातडीने या रस्त्याची दुरुस्ती ग्रामपंचायतीने करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. गावातील नागेशनगरमध्ये ये-जा करण्यासाठी हा महत्त्वाचा रस्ता असून या रस्त्याचा काही भाग अद्याप केलेला नाही. नागेशनगर आणि अनगोळ गल्ली अशा दोन्ही भागांच्या रस्त्यांचे सिमेंटीकरण झालेले आहे. मात्र मधला पट्टा हा खडीकरण करण्यात आलेला नसल्याने एवढ्या भागात चिखल आणि दलदल निर्माण झाली आहे.निसरड झाल्याने अनेक वाहने घसरून पडण्याचे प्रकार घडत आहेत. यामध्ये अनेक जणांना दुखापतीही होत आहेत. सध्या रस्त्यावरती मोठा ख•ा पडून पाणीही साचत आहे. यामुळे रात्रीच्या वेळी ये-जा करताना नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. सदर रस्ता हा महत्त्वाचा असून नागेशनगरमधून नागरिक गावात येण्यासाठी आणि गावातून नागेशनगरमध्ये जाण्यासाठी हा रस्ता महत्त्वाचा आहे. रोज रात्री नागेशनगर भागातील नागरिकांना दूध घालण्यासाठी गावातील डेअऱ्यांमध्ये जावे लागते. अंधारात रस्त्यावर पडलेले ख•s, खड्ड्यातील पाणी आणि दलदल याचा रोज नागरिकांना सामना करावा लागत आहे. अशावेळी या सर्व नागरिकांची बरीच कुचंबणा होत आहे. तरी तातडीने या रस्त्याची दुरुस्ती ग्रामपंचायतीने करावी, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.









