जगाच्या तुलनेत अधिक गाणी ऐकतात भारतीय
आपण भारतीय दर आठवड्याला सरासरी 25.7 तास गाणी ऐक असतो, तर जागतिक सरासरी ही 20 तासांची आहे. म्हणजेच अन्य देशांमधील लोकांच्या तुलनेत भारतीय दर आठवड्याला 5 तास अधिक गाणी ऐकत असतात. देशातील 63 टक्के आणि जगातील 69 टक्के लोकांचे गाणी ऐकल्याने मानसिक आरोग्य सुधारत असल्याचे मानणे आहे. व्यायाम करताना आम्ही गाणी ऐकतो असे 70 टक्के लोकांनी म्हटले आहे. यातील 88 टक्के लोक धावताना, 83 टक्के लोक योग आणि 73 टक्के लोक सायकलिंगदरम्यान गाणी ऐकत असतात.

इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ फोनोग्राफिक इंडस्ट्रीने भारत-चीन समवेत 22 देशांमधील 34 हजार लोकांवर अध्ययन करत एंगेजिंग विथ म्युझिक अहवाल तयार केला आहे. या अहवालानुसार 2022 च्या तुलनेत 2023 मध्ये जागतिक म्युझिक इंडस्ट्री 8 टक्के तर भारतातील संगीत क्षेत्र 13 टक्क्यांनी वाढू शकते. जगात 82 टक्के लोक व्हिडिओ प्लॅटफॉर्म, 74 टक्के लोक ऑडियो प्लॅटफॉर्म, 71 टक्के लोक रेडिओ अणि 68 टक्के लोक शॉर्ट व्हिडिओ अॅप्सवर गाणी ऐकत असतात.
जगात रेडिओच्या श्रोत्यांमध्ये सर्व वयोगटातील लोक आहेत. परंतु 45-54 वयोगटातील 77 टक्के लोक रेडिओ ऐकत असतात. 76 टक्के लोकांसोबत 55-64 वयोगट याप्रकरणी दुसऱ्या स्थानावर आहे. तर 73 टक्के लोकांसोबत 35-44 वयोगट याप्रकरणी तिसऱ्या स्थानी राहिला आहे. 16-24 वयोगटातील 56 टक्के लोक रेडिओचा वापर करत असतात.
रेडिओ
73 टक्के लोक गाणी ऐकण्यासाठी रेडिओचा वापर करतात
46 टक्के लोकांनी गाणी ऐकण्यासाठी घेतले पेड सब्सक्रिप्शन
58 टक्के लोकांनी महिन्याभरात टीव्हीवर म्युझिक शो पाहिला.
53 टक्के लोक पसंतीची प्ले लिस्ट आठवड्यात अधिकवेळा ऐकतात
संगीतक्षेत्र
20000 नवी गाणी दरवर्षी तयार होत आहेत
2007 मध्ये भारतीय संगीत उद्योगक्षेत्र 740 कोटी रुपयांचे
2020 मध्ये भारतीय संगीत उद्योगक्षेत्र 1500 कोटी रुपयांचे









