कार्यकारिणीवर खानापूर तालुका म. ए. समितीच्या पदाधिकाऱ्यांची नेमणूक
बेळगाव : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्त्वपूर्ण बैठक बुधवारी झाली. या बैठकीत मध्यवर्ती म. ए. समितीच्या कार्यकारिणीवर खानापूर तालुका म. ए. समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या. या नेमणुकांचे पत्र अध्यक्ष गोपाळ देसाई यांनी मध्यवर्ती म. ए. समितीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर यांच्याकडे सुपूर्द केले आहे. माजी आमदार दिगंबर पाटील, गोपाळराव देसाई, मुरलीधर पाटील, निरंजनसिंह सरदेसाई, आबासाहेब दळवी, मारुती परमेकर, विलास बेळगावकर, जगन्नाथ बिर्जे, जयराम देसाई, बाळासाहेब शेलार, नारायण कापोलकर, गोपाळ पाटील, पांडुरंग सावंत, शामराव पाटील, रविंद्र शिंदे, रणजित पाटील, राजाराम गावडे, रुक्माण्णा झुंजवाडकर, रमेश धबाले, सदानंद पाटील, रामचंद्र गावकर, अजित पाटील यांची समितीवर निवड करण्यात आली आहे. ही यादी खानापूर म. ए. समितीच्यावतीने मध्यवर्ती समितीकडे देण्यात आली. मध्यवर्ती म. ए. समितीमध्ये खानापूर म. ए. समितीचे पदाधिकारी सहभागी होत होते. खानापूर तालुका म. ए. समितीने काही दिवसांपूर्वीच नवीन कार्यकारिणीची निवड केली असून त्यातील काही सदस्यांची मध्यवर्ती समितीमध्येही निवड करण्यात आली. तालुक्याच्या प्रत्येक विभागातून यामध्ये कार्यकर्त्यांचा समावेश करण्यात आला आहे.









