नियॉन-स्वित्झर्लंड / वृत्तसंस्था
आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू संघटना फेडरेशनच्या (फिका) अध्यक्षपदी माजी ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटू लिसा स्थळेकरची निवड करण्यात आली. नियॉन येथे आयोजित व्यवस्थापकीय कार्यकारिणीच्या बैठकीत या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. लिसाने या निवडीबद्दल आनंद व्यक्त केला. ‘फिकाच्या अध्यक्षपदी झालेली नियुक्ती हा मी माझा सन्मान मानते. पुरुष व महिला गटात सध्या क्रिकेटचे बरेच सामने होत असून जागतिक स्तरावर सहभाग वाढत चालला आहे. सर्व खेळाडूंचे अधिकार अबाधित राहतील आणि प्रशासकांच्या साथीने सरस वाटचालीसाठी आपले प्रयत्न असतील’, असे लिसा याप्रसंगी म्हणाली.









