इचलकरंजी, प्रतिनिधी
Ichalkaranji Crime News : मौजे मुडशिंगी (ता.हातकणगंले ) येथील एका तरुणाला गावठी हातभट्टीच्या दारु वाहतुक करीत,असताना राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांनी पाठलाग करुन पकडले. अनिल हिंदूराव मंडले (रा.जाधव गल्ली, मौजे मुडशिंगी )असे त्याचे नाव आहे.त्याच्याकडून एक चार चाकी गाडी आणि १५० लिटर गावठी हातभट्टीची तयार दारु असा १ लाख ४७ हजार ५७५ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.ही कारवाई बुधवारी दुपारी केली आहे.
हातकणगंले तालुक्यातील मौजे मुडशिंगी येथून शिरोळ तालुक्यात गावठी हातभट्टीच्या तयार दारुची चार चाकी गाडीतून वाहतुक होत आहे.अशी माहिती राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांना बातमीदाराकडून समजली.त्यावरुन राज्य उत्पादन शुल्कच्या इचलकरंजी विभागाचे निरीक्षक अशोक साळोखे यांनी शिरोळ येथील दत्त साखर कारखाना समोरील रस्त्यावर नाका बंदी करुन,चार चाकी गाडीची तपासणी सुरु केली.
दरम्यान, एक कार भरधावपणे शिरोळकडे येत असल्याची नाका बंदीवरील कर्मचाऱ्यांना दिसली.त्यावरुन त्यांनी त्या कारच्या चालकाला गाडी थांबविण्याबाबतचा इशारा केला.तरी देखील त्याने कार न थांबविता भरधावपणे पुढे जावू लागला.त्यावेळी राज्य उत्पादन शुल्कचे निरीक्षक अशोक साळोखे,दुय्यम निरीक्षक अंकिता पाटील,जवान बलराम पाटील,सागर नागटिळे,संदिप माने,शिवलिंग कंठे आदीनी त्या कारचा पाठलाग करुन कार थांबविली.कारची तपासणी केली असता त्यामध्ये दोन पोत्यामध्ये तयार गावठी हातभट्टीच्या दारु मिळून आली.या दारुसह कार जप्त करीत,कारचा चालक अनिल मंडले याला अटक केली.









