120 अपंगांना कृत्रिम फूट देणार
बेळगाव : लायन्स क्लब ऑफ बेळगाव आणि महावीर लिंब सेंटर हुबळी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत कृत्रिम जयपूर लिंब कॅम्पचे मोजमाप शिबिर पार पडले. रविवारी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्स हॉलमध्ये हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. शिबिराची सुरुवात महावीर लिंब सेंटरतज्ञांचे स्वागत करून करण्यात आली. बेळगाव, विजापूर, गोवा व कोल्हापूर येथील गरजूंनी या मोफत शिबिराचा लाभ घेतला. एकूण 120 अपंगांना 45 दिवसांत कृत्रिम अवयव उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासाठी अंदाजे तीन लाखाहून अधिक खर्च येणार आहे. डेंटल असोसिएशन, उद्योगपती, समाजसेवी संस्था, दंतचिकित्सक आदीनी भेट देऊन या शिबिराचे कौतुक केले. रविंद्र काकती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. लायन्स क्लबच्या सदस्यांनी सदर शिबिर यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. यावेळी क्लबचे अध्यक्ष दया शहापूरकर, सचिव एल. एन. गीता कित्तूर, खजिनदार जयश्री हलभावी, राजशेखर हिरेमठ, श्रीधर उप्पीन, प्रभाकर शहापूरकर, हेमंत कित्तूर, भारती वडवी, सतीश बाळेकुंद्री आदी उपस्थित होते. यावेळी महावीर लिंब सेंटरच्या तज्ञांचे आभार मानण्यात आले.









