दोडामार्ग – वार्ताहर
लायन्स क्लब ऑफ इंटरनॅशनल अंतर्गत लायन्स क्लब ऑफ गडहिंग्लज रॉयल मार्फत सन २०२३ चा लायन्स आदर्श शिक्षक पुरस्कार न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय भेडशीचे प्राचार्य तथा धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई या संस्थेचे सहसचिव नंदकुमार नारायण नाईक यांना जाहीर करण्यात आला आहे. १६ सप्टेंबर रोजी गडहिंग्लज येथील स्वंयवर मंगल कार्यालयात हा पुरस्कार श्री. नाईक यांना प्रदान करण्यात येणार आहे.
आपल्या शाळेप्रती, विद्यार्थीप्रती असलेले पवित्रकार्य तसेच आपण केलेल्या सामाजिक, शैक्षणिक, क्रिडा या क्षेत्रातील आपले योगदान यांचा विचार करुन श्री. नाईक यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ, कोल्हापूरचे एस. एस. सी. बोर्डचे सचिव दत्तात्रय पोवार यांच्या हस्ते हा पुरस्कार श्री. नाईक यांना प्रदान करणेत येणार आहे. श्री. नाईक यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल संस्थेचे अध्यक्ष सिमा तोरसकर, कार्याध्यक्ष डाॅ.मिलिंद तोरसकर, सचिव कल्पना तोरसकर, समन्वय समिती सचिव रश्मी तोरसकर, खजिनदार वैभव नाईक, शालेय समिती सदस्य, साटेली – भेडशी पंचक्रोशीतील ग्रामस्थ तसेच सर्वच स्तरातून शुभेच्छा देण्यात येत आहेत.









