वृत्तसंस्था / ब्युनोस आयरीस
अर्जेंटिनाचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू लायोनेल मेसी याला स्नायु दुखापत झाल्याने तो फिफाच्या होणाऱ्या विश्वकरंडक पात्र फेरीच्या ब्राझील आणि उरुग्वे यांच्याबरोबर होणाऱ्या सामन्यात खेळू शकणार नाही.
रविवारी मेजर लीग फुटबॉल स्पर्धेतील सामन्यात खेळताना मेसीला ही दुखापत झाली होती. या स्पर्धेत मेसी इंटर मियामी संघाकडून खेळत होता. इंटर मियामी संघाने या सामन्यात अॅटलांटा युनायटेड संघाचा 2-1 असा पराभव केला. मेसीने या सामन्यात निर्णायक गोल केला होता. अर्जेंटिनाचा संघ या पात्र फेरीच्या सामन्यासाठी जाहीर केला असून 37 वर्षीय मेसीला वगळण्यात आले आहे. मेसी सध्या अमेरिकेत या दुखापतीवर वैद्यकीय इलाज करवून देत आहेत. अर्जेंटिनाचा उरुग्वे बरोबरचा सामना येत्या शुक्रवारी तर ब्राझील बरोबरचा सामना 25 मार्चला होणार आहे. ब्राझील संघातून दुखापतीमुळे नेमार खेळणार नाही.









