2017 मध्ये शाहरुख खान बनला होता ब्रँड ऍम्बेसेडर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
एडटेक कंपनी बायजूस यांनी शुक्रवारी लोकप्रिय फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीला त्याच्या सोशल इम्पॅक्ट आर्म-एज्युकेशन फॉर ऑल यांचा ब्रँड ऍम्बेसेडर म्हणून घोषणा केली आहे. बायजूसचे सह-संस्थापक दिव्या गोकुलनाथ यावेळी म्हणाल्या, ‘आम्ही लिओनेल मेस्सीला आमचा ग्लोबल ऍम्बेसेडर म्हणून घोषित केला आहे. कारण तो आता सर्वात यशस्वी खेळाडू बनला आहे.’
मेस्सीला ब्रँड ऍम्बेसेडर बनवण्यासाठी किती पैसे मोजावे लागले आहेत. ते मात्र कंपनीने उघड केलेले नाही. बायजूसने जाहिराती आणि ब्रँड ऍम्बेसेडरसह मोठे पाऊल उचलण्याची ही पहिलीच वेळ नाही. 2017 मध्ये, त्यांनी बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानला त्यांचा ब्रँड ऍम्बेसेडर म्हणून नियुक्त केले. 2019 मध्ये, कंपनी भारतीय क्रिकेट संघाची मुख्य प्रायोजक बनली.
विशेष म्हणजे, नफा वाढवण्यासाठी आणि खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी सुमारे 2,500 कर्मचाऱयांना कामावरून काढत असताना बायजूसने ही निवड केली आहे. कंपनीला आर्थिक वर्ष 2021 मध्ये 4,589 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे, जो कोणत्याही भारतीय स्टार्टअपचा आतापर्यंतचा सर्वात मोठा तोटा आहे.
मेस्सीने पहिला करार नॅपकिन पेपरवर केला. तो 2000 मध्ये वयाच्या 13 व्या वर्षी बार्सिलोनामध्ये दाखल झाला होता.
पहिला आंतरराष्ट्रीय सामना 2005 मध्ये खेळला
मेस्सी 5वा विश्वचषक खेळणार आहे. त्याने 2005 मध्ये अर्जेंटिनाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने 164 सामन्यांमध्ये 90 गोल केले आहेत. त्याने 19 विश्वचषक सामन्यांमध्ये 6 गोल केले आहेत. जर आपण एकूण कारकिर्दीबद्दल बोललो तर मेस्सीने 781 गोल केले आहेत.









