थंडीच्या दिवसात त्वचाविकार केसगळती त्याचबरोबर सांधे दुखी, कंबरदुखी तसेच केस गळती वाढते. पण या विकारांवर जवसाचे लाडू एकदम उपयुक्त ठरतात. थंडीमध्ये डिंकाचे लाडू, मेथीचे लाडू, सुक्या मेव्याचे लाडू असे अनेक प्रकारचे लाडू घरी केले जातात. खतोच. पण अगदी कमी खर्चात आणि तितकेच पौष्टिक जवसाचे लाडू आपण घरच्या घरीही बनवू शकतो. हे लाडू कसे बनवायचे ते आपण जाणून घेऊयात.
साहित्य
जवस – 1 वाटी
गव्हाचे पीठ – 1 वाटी
बदाम 10-12
पांढरे तीळ – 2 चमचे
साजूक तूप – अर्धी वाटी
डिंक – पाव वाटी
गूळ 1 वाटी
खाण्याचे तीळ तेल- 1 चमचा
खाण्याचे बदाम तेल- 1 चमचा
वेलची पूड – 1 चमचा
सुंठ पूड – 1 चमचा
कृती
सर्वप्रथम एका कढईत मंद आचेवर जवस ३ ते ४ मिनिटे भाजून घ्यावी. यानंतर मंद आचेवर तीळ एक मिनिटं भाजून घेऊन बाजूला ठेवायचे आहेत. आता तुपामध्ये बदाम आणि डिंक तळून घ्यावा. आणि बाजूला थंड करत ठेवावा. यांनतर एका कढईमधे ४ चमचे तूप घालून त्यात गव्हाचे पीठ एकसारखे हलवून भाजून घ्यावे. आणि थंड होण्यासाठी बाजूला ठेवावे. आता जवस,तीळ ,बदाम आणि डिंक मिक्सरला वाटून घ्यावे. यानंतर त्यामध्ये वेलची आणि सुंठ पावडर तसेच थंड झालेले गव्हाचे पीठ घालून सर्व मिश्रण एकजीव करून घ्यावे. यानंतर गुळाचा एकतारी पाक तयार करून घ्यावा. आणि त्यामध्ये सर्व मिश्रण घालावे. मिश्रण थोडे थंड झाल्यावर हाताला तूप लावून सर्व लाडू वळून घ्यावेत.
Previous Articleआचरा समुद्रात ऑलिव्ह रिडले कासवांच्या ७५ पिल्लांना सोडले
Next Article आ. वैभव नाईकांकडून अभिमन्यू लोंढे यांचा गौरव









