प्रतिनिधी / बेळगाव
मतदारकार्डला आधार जोडणी करण्याची मोहीम दि. 12 नोव्हेंबर रोजी राबविण्यात येणार आहे. ऑनलाईनच्या माध्यमातून ही मोहीम सुरू करण्यात आली असून त्या दिवशी मोठय़ा प्रमाणात मतदारकार्डला जोडणी केली जाणार आहे. त्यामध्ये भाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
ज्यांनी मतदारकार्डला आधार जोडणी केली नाही; त्यांनी ऑनलाईनच्या माध्यमातून आधारलिंक करावी. याचबरोबर 6-बी हा फॉर्म भरून आपण त्याची जोडणी करू शकतो. यासाठी ओळखपत्रांची गरज आहे.
आधार जोडणी करण्यासाठी कामगार कार्ड, छायाचित्रासह असलेले बँक खाते, आरोग्य विमा, वाहन परवाना, पॅन कार्ड, एनपीआर कार्ड, भारतीय पासपोर्ट, पेन्शन प्रमाणपत्र, केंद्र, राज्य किंवा इतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नोकरी करत असलेले ओळखपत्र यामधील कोणतेही एक ओळखपत्र मतदारकार्ड जोडणीसाठी चालू शकते, असे कळविण्यात आले आहे.
तरी या मोहिमेमध्ये सर्वांनी भाग घेऊन मतदारकार्डला आधार जोडणी करून घ्यावी, असे कळविण्यात आले आहे.









