ओटवणे प्रतिनिधी
पंचक्रोशी मर्यादित भजन स्पर्धेत सरमळेचे सप्तसूर प्रासादीक भजन मंडळ प्रथम
सरमळे येथील श्री सातेरी भगवती कला, क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळाने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत जानवली – कणकवली येथील श्री लिंगेश्वर प्रासादींक भजन मंडळाने प्रथम क्रमांक पटकाविला. तर सरमळे पंचक्रोशी मर्यादीत भजन स्पर्धेत सरमळे येथील सप्तसुर प्रासादीक भजन मंडळाने प्रथम क्रमांक पटकाविला.या भजन स्पर्धेच्या उद्दघाटनप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोकण महिला विभागाच्या अध्यक्षा सौ. अर्चना घारे परब, सरमळे सरपंच विजय गावडे, उपसरपंच दीपांकर गावडे, देवस्थानचे मानकरी गंगाराम गावडे, नाना गावडे, अविनाश गावडे, अर्जुन गावडे मंडळाचे अध्यक्ष समिर गावडे, उपाध्यक्ष संजय गावडे, सेक्रेटरी रविंद्र सावंत, खजिनदार सागर गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.
जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे प्रथम श्री लिंगेश्वर प्रासादिक भजन मंडळ (जानवली – कणकवली) बुवा योगेश मेस्त्री, द्वितीय क्रमांक -श्री मोरेश्वर प्रासादीक भजन मंडळ (नेरूर) बुवा भार्गव गावडे, तृतीय क्रमांक श्री देवी सातेरी प्रासादीक भजन मंडळ (मातोंड) बुवा विशाल घोगळे, उत्तेजनार्थ प्रथम – श्री दत्तकृपा प्रासादीक भजन मंडळ (वैभववाडी) बुवा विराज तांबे, द्वितीय श्री गोठण प्रासादीक भजन मंडळ (वजराट) बुवा सोमेश वेंगुर्लेकर, उत्कृष्ट गायक बुवा सत्यनारायण करंगुटकर, उत्कृष्ट तबला – अक्षय कांबळी, उत्कृष्ट पखवाज वादक कुणाल आळवे सर्व श्री देवी माऊली प्रा भजन मंडळ (साटेली), उत्कृष्ट हार्मोनियम वादक अमोल गवस, श्री सातेरी प्रासादीक भजन मंडळ (मातोंड), उत्कृष्ट चकवी वादक- मनोज तांबे श्री दत्तकृपा प्रासादीक भजन मंडळ (वैभववाडी), उत्कृष्ट कोरस श्री गोठण प्रासादीक भजन मंडळ (वजराट), शिस्तबद्ध संघ श्री लिंगेश्वर प्रासादीक भजन मंडळ (जानवली)
सरमळे पंचक्रोशी भजन स्पर्धा निकाल पुढीलप्रमाणे प्रथम क्रमांक श्री सप्तसुर प्रासादीक भजन मंडळ (सरमळे) बुवा राजा सरमळकर, द्वितीय क्रमांक- श्री ब्राम्हण देव प्रासादीक भजन मंडळ (सोनुर्ली) बुवा अनंत नाईक, तृतीय क्रमांक श्री माऊली प्रासादीक भजन मंडळ (बावळाट) बुवा महादेव राऊळ, उत्तेजनार्थ प्रथम – श्री रवळनाथ प्रासादीक भजन मंडळ (ओटवणे), द्वितीय श्री ब्राम्हणदेव प्रासादीक भजन मंडळ (डेगवे), उत्कृष्ट गायक आणि उत्कृष्ट हार्मोनियम वादक श्री सप्तसूर प्रा भजन मंडळ (सरमळे), उत्कृष्ट पखवाज वादक, तबला वादक, चकवी वादक, कोरस सर्व श्री ब्राम्हण देव प्रा. भजन मंडळ (सोनुर्ली), शिस्तबद्ध मंडळ -श्री माऊली प्रासादीक भजन मंडळ (बावळाट).
दोन्ही गटातील या भजन स्पर्धेला भजन रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. भजन स्पर्धा परीक्षक म्हणून संजय साबाजी दळवी आणि महेश सावंत यांनी काम पाहिले. भजन स्पर्धेचे पारितोषिक वितरण मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धेतील सर्व विजेत्यांसह वैयक्तिक विजेत्यांना रोख रक्कम व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.









