
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
पदवीपूर्व शिक्षण खाते व आरपीडी पदवीपूर्व महाविद्यालय आयोजित जिल्हास्तरीय पदवीपूर्व व्हॉलीबॉल स्पर्धेत पुरूष गटात लिंगराज महाविद्यालय बेळगाव तालुका संघाने कित्तूर संघाचा तर महिला गटात सिद्दरामेश्वर बेळगाव संघाने कित्तूर संघाचा पराभव करून जेतेपद पटकावले. यामुळे बेळगाव तालुक्मयाला दुहेरी मुकुट पटकावण्याचा मान मिळाला.
आरपीडी महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित या स्पर्धेत महिलांच्या गटात पहिल्या उपांत्य सामन्यात बेळगाव सिद्दरामेश्वर संघाने बैलहोंगल संघाचा 25-17, 25-21 तर दुसऱया उपांत्य सामन्यात कित्तूर संघाने खानापूर संघाचा 25-19, 25-22 अशा सेटमध्ये पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात बेळगाव संघाने कित्तूर संघाचा 25-18, 21-25, 15-10 अशा सेटमध्ये पराभव करून विजेतेपद पटकाविले. पुरूष गटात खेळविण्यात आलेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात कित्तूर संघाने सौंदत्ती संघाचा 25-14, 25-20 तर दुसऱया उपांत्य सामन्यात बेळगाव संघाने खानापूर संघाचा 25-20, 25-17 अशा सेटमध्ये पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात बेळगाव संघाने कित्तूर संघाचा 25-16, 25-23 अशा सेटमध्ये पराभव करून विजेतेपद पटकाविले.
स्पर्धेनंतर बक्षीस वितरणप्रसंगी प्रमुख पाहुणे माजी ज्ये÷ व्हॉलीबॉलपटू व भारतीय व्हॉलीबॉल संघाचे प्रशिक्षक बसवराज होसमठ, एच. एस. सिंगाडे, एसकेईचे सभासद आनंद सराफ, जी. एन. पाटील, सतीश सनदी, क्रीडा प्राध्यापक देवेंद्र कुडची व प्राचार्य काशिनाथ मेळद, प्रशांत मनकाळे आदींच्या हस्ते विजेत्या लिंगराज व सिद्दरामेश्वर तर उपविजेत्या कित्तूर संघांना चषक व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.
स्पर्धेसाठी पंच म्हणून एच. एस. शिंगाडे, शंकर कोलकर, राजू चौगुले, भरत अक्षिमनी, सतीश सनदी, उमेश मजुकर यांनी काम पाहिले. यावेळी विनय नाईक, मुत्तुराज चौका व आरपीडी पदवीपूर्व महाविद्यालयाचे प्राध्यापक व विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित होते.









