झपाझप चढली भिंतीवर
सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडिओंना मोठा प्रेक्षकवर्ग लाभत असतो. अशाच प्रकारचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या व्हिडिओत एक लहान मुलगी झपाझप भिंतीवर चढत आणि तितक्याच वेगाने खाली उतरत असल्याचे दिसून येते. हा व्हिडिओ पाहून अनेकांना स्पायडरमॅनची आठवण होत आहे. यामुळे ही तर स्पायडरमॅनची बहिण अशी प्रतिक्रिया सोशल मीडियात उमटत आहे.
भिंतीवर झपाझप चढण्याची शक्ती केवळ सुपरमॅन किंवा सुपरवुमनकडेच असते. पण आता अनेकांमध्ये हे टॅलेंट दिसून येत आहे. लहान मुले स्पायडरमॅनचे चाहते असतात, त्यांचे अनुकरण करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. अशीच एक मुलगी स्पायडरमॅनची नक्कल करताना नव्हे तर त्याच्यासारखी झपाझप भिंतीवर चढून जाताना एका व्हिडिओत दिसून आली आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओत लहान मुलगी दोन अरुंद भिंतींच्या मध्ये उभी असल्याचे आणि तेथून एका झटक्यात भिंतींना दोन पाय लावून चढते आणि पटकन घराच्या छतापर्यंत पोहोचत असल्याचे दिसून येते. यानंतर ती सहज खाली उतरते. तिची ही स्टंटबाजी पाहून सर्वजण चकित होत आहेत. या स्टंट गर्लचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 1 लाख 49 हजारांहून अधिक लोकांनी लाइक केले आहे. तर अनेकांकडून त्यावर प्रतिक्रिया आल्या आहेत.









