Nitin Gadkari : नागपूरप्रमाणे नाशिकमध्ये डबलडेकर उड्डाणपूल होणार अशी घोषणा रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली. मेट्रोसाठी ‘इलिव्हेटेड कॉरीडॉर’तंर्गत नाशिक रोड ते द्वारका चौक या मार्गावर नागपूरप्रमाणे डबल डेकर उड्डाणपुलाच्या सोळाशे कोटींच्या मार्गाला मंजुरी दिली असल्याची माहिती त्यांनी दिली.
मेट्रो प्रकल्पात गंगापूर ते नाशिक रोड हा वीस,तर गंगापूर ते मुंबई नाका हा दहा किलोमीटर असे दोन मार्ग असतील.त्यातील गंगापूर ते नाशिक रोड या मार्गावरील नाशिक रोड ते द्वारका चौक या सहा किलोमीटर अंतरावर डबल डेकर मार्ग असेल.जमिनीवर दोन,त्यावर दोन व उड्डाणपुलावर चार पदरी मार्ग असेल.त्यावरुन मेट्रो धावणार आहे.याशिवाय इंदिरानगरच्या संलग्न सर्व्हिसरोडचा ‘अंडरपास’ आणि राणेनगर बोगद्याच्या संलग्न सर्व्हीस रोडचा ‘अंडरपास’ वाढवण्याचे काम केले जाईल असेही ते म्हणाले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









