Hair Care Tips : केस गळणे, केस तुटणे, केस खूप ड्राय होणे, केसात कोंडा होणे या समस्या अनेक महिलांना सध्या जाणवत असतील.बदलत्या जीवनशैलीच्या परिणामामुळे हे सगळे प्रोब्लेम सुरु होतात. यासाठी अगदी सुरुवातीपासून आपण काही गोष्टींची काळजी घेतली तर नक्कीच आपल्याला या समस्येपासून सुटका होण्यास मदत होईल. नेमकी काय काळजी घ्यायची चला तर जाणून घेऊया.
मोठ्या दाताचा कंगवा वापरा
तुमचे केस जर खूप दाट आणि लांबसडक असतील तर केस मोकळे करण्यासाठी लांब दातांचा आणि जास्त आंतर असणारा कंगवा वापरा. तुम्ही लाकडी कंगवाही वापरू शकता. केस मोकळे झाल्यानंतर तुम्ही लहान कंगवा वापरून वेगळी हेअर स्टाईल करू शकता.यामुळे तुमचे केस जादा गळणार नाहीत आणि तुटणारही नाहीत.
केस विंचरताना अशी घ्या काळजी
तुमचे केस जर खूप लांबीला असतील तर केस वरून खाली न विंचरता खालून वरती विंचरा.यासाठी केसांच्या शेंड्याचा भाग सुरुवातीला त्यानंतर मध्य भाग आणि मग शेवटी वरच्या दिशेला केस विंचरणेस सुरुवात करा.यामुळे तुमचे केस डॅमेज होणार नाहीत, गुंता काढताना हेअर लॉस होणार नाही.आणि केस मोकळे करणे एकदम सोपे हाईल.
केसांना ड्राय होण्यापासून असे वाचवा
केस वॉश केल्यानंतर केस कोरडे होण्यासाठी केसांना मऊ टरकिस टाॅवेलने केस बांधून ठेवा. तुम्ही टी-शर्टचा देखील वापर करू शकता. केस डायरेक्ट झाडू नका. सुकल्यानंतर टाॅवेल बाजूला करून केस मोकळे करून घ्या. यामुळे केस तुटणार नाहीत.
केसांना हेअर स्टाईल करताना ह्या गोष्टी लक्षात ठेवा
केस सुकवण्यासाठी अनेकजणी हेअर ड्रायरचा वापर करतात किंवा हेअर स्टाईल करण्यासाठी ब्लो ड्रायरचा वापर करता. केस ड्रायर करताना सुरुवातीला हिटिंग स्प्रे चा वापर करा.त्यानंतर ड्रायरचा वापर करा. यामुळे केसांना अतिरिक्त उष्मा जाणवणार नाही.
हेअर मास्क वापरा
केस वाॅश करण्यासोबत केसांना पंधरा दिवसातून किमान एकदा जेंटल हेअर मास्क वापरा. बाजारात अनेक हेअर मास्क विकत मिळतात किंवा तुम्ही घरीही मास्क बनवू शकता. यासाठी एक केळ, मध आणि खोबरेल तेल किंवा दहीचा वापर करा. हे मिश्रण मिक्सरला एकत्र करून घ्या. त्यानंतर केसांना लावून घ्या.
केस गळतीवर उपाय
केस गळती कमी करण्यासाठी केसांना तेल लावायच्या आधी केस चांगले विंचरून घ्या.त्यानंतर केसांना तेल लावा.यामुळे केसगळती कमी होईल.
सिरमचा वापर करा
केसातील गुंता कमी होण्यासाठी केस वाॅश केल्यानंतर थोडे कोरडे झाल्यावर केसांना सिरम लावा. यामुळे केसाचा गुंता कमी होईल आणि केस शायनिंग करतील.
Previous ArticleRatnagiri : कोकण रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक बिघडले!
Next Article Kolhapur : खुपिरेत तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या









