दापोली :
तालुक्यातील टेटवली मोहल्ला येथे एका घराच्या बाजूला असलेल्या विहिरीत पावसाळ्यात मूळ अधिवास सोडून आलेल्या मगरीला वनविभागाने पिंजऱ्यात पकडून सुरक्षितरित्या नैसर्गिक अधिवासात सोडले
पावसाळ्यात मनुष्यवस्तीत असलेल्या विहिरीत 130 सेंटीमीटरची नर जातीची मगर आली होती. या बाबत वनविभागाला कळवण्यात आल्यानंतर वनविभागाचे रत्नागिरी–चिपळूण विभागीय वनाधिकारी गिरीजा देसाई व दापोलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल रामदास खोत, वनरक्षक शुभांगी भिलारे, शुभांगी गुरव, विश्वंभर झाडे, सुरज जगताप, संदीप गोरीवले यांनी या मगरीला विहिरीतून पिंजऱ्याच्या सहाय्याने पकडून बाहेर काढले. तिची वैद्यकीय तपासणी करुन तिला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.








