गुहागर :
गुहागर येथे समुद्रात आंघोळ करता करता खोल पाण्यात गेल्याने बुडणाऱ्या कराडमधील पर्यटकाला पाण्याबाहेर काढून त्याचे प्राण वाचवण्याचे काम नगरपंचायतीचे जीव रक्षक प्रदेश तांडेल व त्याच्या सहकाऱ्यांनी केले. ही घटना मंगळवारी सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान घडली. अजित डुंबरे असे या पर्यटकाचे नाव आहे तो आपल्या मित्रांसमवेत गुहागरमध्ये फिरावयास आला होता.








