सरवडे प्रतिनिधी
उंदरवाडी (ता. कागल ) येथील सर्प मित्र प्राणी मित्र बाजीराव कुदळे यांनी झाडावरून खाली पडलेल्या छोट्याशा उद मांजराला अडीच महिने सांभाळले. त्याची सुखरुप काळजी घेवून उदमाजराला उंदरवाडीच्या जंगलात (अधिवासात) सुखरूप सोडून त्याला जीवदान दिले आहे. बाजीराव यांच्या भूतदयेचे कौतुक व्यक्त होत आहे.
प्राणी मित्र बाजीराव यांना उंदरवाडीतील आर. एस. पाटील यांच्या घराच्या पाठीमागे अडीच महिन्यापूर्वी नारळाच्या झाडावरून पडलेला एक छोटासा प्राणी सापडला. कुत्र्यांच्या हल्ल्याचा तो बळी पडू नये म्हणून त्यांनी या प्राण्याला जनावरांचे टॉनिक, दूध व अन्य अन्न देऊन त्यांचे जतन केले. त्याची अडीच महिने काळजी घवून ठीक केले. ते ठीक झाल्यानंतर त्याला जंगलात सुखरूप सोडून दिले.
सुरवातीला हा प्राणी शेकरू असावा असे वाटले पण अडीच महिन्या नंतर ते दुर्मिळ उद मांजर असल्याचे लक्षात आल्यानंतर कुदळे यांनी त्याला उंदरवाडीच्या जंगलात सोडले. यापूर्वी सर्पमित्र कुदळे यांनी अनेक सापांना जीवदान देवून जंगलात सोडले आहे.