मलप्पुरम
केरळमध्ये एका पित्याने स्वतःच्याच अल्पवयीन मुलीचे वारंवार लैंगिक शोषण केले होते. याप्रकरणी आता न्यायालयाने आरोपी पित्याला तीनवेळा जन्मठेप ठोठावली आहे. न्यायालयाने भादंवि तसेच पॉक्सो अंतर्गत तसेच पीडितेला धमकाविण्याच्या आरोपाखाली पित्याला दोषी ठरविले आहे. मार्च 2021 मध्ये पीडितेच्या पित्याने तिच्यावर बलात्कार केला होता. कोरोनाकाळात ऑनलाइन वर्ग सुरू असल्याने 15 वर्षीय मुलगी घरातच अभ्यास करत होती. मुलगी एकटी असल्याचे पाहून तिच्या वडिलांनी तिचे लैंगिक शोषण केले होते. पीडितेच्या आईला जीवे मारण्याची धमकी देत त्याने हे दुष्कृत्य केले होते.









