► वृत्तसंस्था/ वाराणसी
उत्तर प्रदेशातील पूर्वांचलमधील शक्तिशाली नेता मुख्तार अन्सारी याला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी त्याला आणखी एका प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. बनावट शस्त्र परवानाप्रकरणी बाहुबली मुख्तार अन्सारीला जन्मठेप आणि 2.20 लाख ऊपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. वाराणसीचे विशेष न्यायाधीश (भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा) अवनीश गौतम यांच्या न्यायालयाने फसवणूक करून शस्त्र परवाना मिळवल्याप्रकरणी बाहुबली माजी आमदार मुख्तार अन्सारी याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. वाराणसीचे विशेष न्यायाधीश अवनीश गौतम यांच्यासमोर बुधवारी शिक्षा ठोठावण्यासंबंधी अंतिम सुनावणी झाली.









