सावंतवाडी । प्रतिनिधी
मळेवाड येथील नवविवाहितेने तिच्या माहेरी न्हावेली येथे सोमवारी रात्री विहिरीत उडी टाकून आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. अक्षरा अक्षय नाईक (वय 26) असे तिचे नाव असून ती मळेवाड येथुन माहेरी न्हावेली येथे आली होती. घटनास्थळी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण ,उपनिरीक्षक माधुरी मुळीक यांनी भेट देऊन पाहणी केली अक्षरा( प्रतीक्षा परब माहेरचे नाव) हिचा दोन महिन्यापूर्वी मळेवाड येथील अक्षय यांच्याशी विवाह झाला होता . अक्षरा हिचा तळवडे येथे टेलरिंगचा व्यवसाय होता.









